शेतकरी कर्जमाफी प्रमाणेच मागासवर्गीय महामंडळांना कर्जमाफी द्यावी रिपब्लिकन पार्टीची(आठवले)ची मागणी.
पालकमंत्री ना. अबिटकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीसमोर कर्जमाफी विषय मांडण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले..
कोल्हापूर दिनांक २५-
–मागासवर्गीय महामंडळाच्या संपूर्ण कर्जमाफीचे निवेदन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांना कोल्हापूर सर्किट हाऊस येथे देण्यात आले. कर्जमाफी विषय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे आश्वासन नामदार अबिटकर साहेब यांनी दिले. आंदोलनाची भूमिका प्रा. शहाजी कांबळे यांनी व्यक्त केली.
महामंडळाच्या कर्जमाफीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने दिनांक 15 एप्रिल पासून राज्यव्यापी कर्जमाफी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, रिपब्लिकन एम्पलोयीज फेडरेशन जिल्हाध्यक्ष डॉक्टर कृष्णा सडोलीकर संघटक बटू भामटेकर आणि सहकारी.





