राजेंद्र भारूड यांच्यासमवेत शहर विकास कामांचा आढावा; पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना

Spread the news

कोल्हापूर शहरातील विविध कामांचा आढावा महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या समवेत झालेल्या व्यापक बैठकीत घेतला. अरे प्रामुख्याने कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईन, पाणीपुरवठा पाईपलाईन तसेच गॅस पाईपलाईनच्या कामांचा आढावा घेतला. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी करण्याची डेडलाईन निश्चित करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाला दिल्या. कोल्हापूर शहरातील उद्यानांच्या सुशोभीकरणासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करावा. प्रायोगिक तत्त्वावर महावीर उद्यानात हा उपक्रम राबवावा असे निर्देश दिले. केशवराव भोसले नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बदलणे गरजेचे आहे. यासाठी लागणारा दीड कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री महोदयांकडून खास बाब म्हणून मंजूर केला जाईल. यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा अशा सूचना शहर अभियंता रमेश मस्कर यांना दिल्या. नालेसफाईच्या सुरू असलेल्या कामांना गती द्यावी तसेच ड्रेनेज पाईपलाईन ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी अशा सूचना दिल्या. शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालयाची व्यवस्था तसेच पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. कोल्हापूर शहरातील सीसीटीव्ही सिग्नल यंत्रणा तसेच अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात पोलीस प्रशासन तसेच गृह विभागासोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या बैठकीला जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!