‘छावा प्रतिष्ठान’तर्फे सांगलीत फराळ वाटप

Spread the news

‘छावा प्रतिष्ठान’तर्फे
सांगलीत फराळ वाटप

­

 

सांगली, ता. २५ ः आषाढी एकादशीनिमित्त येथील छावा प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे फराळ व फळे वाटप करण्यात आले. येथील राममंदिर चौकात हा कार्यक्रम झाला. शहरातील दोन हजार विठ्ठल भक्तांनी याचा लाभ घेतला. संस्थापक सुशांत काळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नलवडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम झाला.
छावा प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबीर, शिवजयंतीसह अनेक सामाजिक उपक्रमांत या प्रतिष्ठानचा सहभाग असतो. कोरोना, महापूर काळात ही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत सामाजिक केला. गेल्या पाच वर्षांपासून एकादशीनिमित्त फराळ वाटप केले जाते. यंदाही व्यापक प्रमाणावर हा कार्यक्रम घेण्यात आला. सांगलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, समरादित्या कदम, जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थानचे संस्थापक नितीन चौगुले, सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, शिव भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. छावा प्रतिष्ठानचे आशिष पवार, प्रशांत काळे, अरूण चव्हाण, चंद्रकांत जाधव, सुधीर चव्हाण, विशाल लोकापुरे, स्वप्नील मुळे, विनोद काजवे, विशाल पडूळकर, अबु मुसा, अवधूत दुधाळ, स्वप्नील हिप्परकर, प्रविण मुळके, मयुर माने, प्रशांत देवकर, मानसिंग शिंदे, प्रतिक नलवडे, राकेश वठार, सचिन गवळी, शुभम भोरकडे, निलेश मुळके, गणेश मुळके, नीरज पवार यांनी संयोजन केले.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!