संत सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा व समाज मेळावा

Spread the news

🕉️*संत सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा व समाज मेळावा*

­

 

इचलकरंजी वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने संत सावता माळी महाराज यांचा 731 वा संजीवन समाधी
सोहळा व समाज मेळावा रोटरी क्लब इचलकरंजी येथे मोठ्या भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सुरुवातीस संत सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे यथासांग पूजन समाजातील ज्येष्ठ सदस्य श्री. व सौ. सदाशिव माळी सर श्री. व सौ. नायकू माळी साहेब, श्री. व सौ. सचिन माळी साहेब या दांपत्याच्या शुभहस्ते करण्यात आले. संपूर्ण पूजापाठ श्री. दयानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष श्री. संजय माळी यांनी पूजेचे मानकरी, सर्व समाज बांधव व भगिनी यांचे स्वागत केले. श्री. परशुराम कोरे सर यांनी संत सावता माळी महाराज यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. समाजाचे अध्यक्ष श्री. रमेश माळी यांनी समाजाच्या प्रगतीचा आलेख सर्वांसमोर मांडला. सिव्हिक कमिटीचे सदस्य श्री. मुकुंद माळी यांनी समाजाच्या एकजुटीचे महत्व विशद केले. संचालक श्री. हरी माळी यांनी समाजाची जागा घेण्याचे जे ध्येय आहे त्यासाठी केलेल्या एकंदर कार्यप्रणालीचा आढावा समाजासमोर सादर केला. युवक कमिटीचे अध्यक्ष श्री. सचिन माळी यांनी संचालक मंडळाने केलेल्या एकंदर प्रगती विषयी आनंद व समाधान व्यक्त केले.
या सोहळ्यासाठी समाजाचे सिव्हिक कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री. युवराज माळी, सदस्य श्री. शिवाजी माळी, उपाध्यक्ष श्री. दिपक माळी, महिला कमिटीच्या अध्यक्षा सौ. शुभांगी माळी खजिनदार कुमार माळी, सुहास माळी, सूर्यकांत माळी, आनंदा माळी, अनिल माळी, डॉक्टर उत्तम माळी, प्रशांत माळी, समाजाचे सर्व संचालक, सर्व कमिट्यांचे सदस्य सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाचे माजी सेक्रेटरी श्री. सूर्यकांत माळी सर यांनी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांनी कार्यक्रमासाठी मोफत हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल रोटीरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. श्री. बबन माळी यांनी प्रतिमा पूजनाची मांडणी व सजावट मोफत करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. श्री. दत्तात्रय
माळापगोळ यांनी मोफत गोड प्रसादाची सोय केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
🙏🙏🙏🙏🙏
आपला स्नेहांकित,
श्री. संजय माळी
अध्यक्ष सांस्कृतिक कमिटी

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!