मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विरोधकांचे बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागर

Spread the news

मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विरोधकांचे बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा : आमदार राजेश क्षीरसागर
शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत स्वत: उतरण्याचे आवाहन
कोल्हापूर दि.५ : भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याद्वारे जिल्ह्यासह शहरातील बोगस मतदान कायमचे हद्दपार करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली असून, आपल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसरशी संपर्क साधून स्वत: भागातील या मोहिमेत सहभागी व्हावे. प्रत्यक्ष ऑन फिल्ड अभ्यासपूर्ण काम करून मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विरोधकांचे बोगस मतदानाचे मनसुबे उधळून लावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना केल्या.
शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे झालेल्या शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, गेली अनेक वर्षे बोगस मतदानाचा खेळ विरोधकांकडून सुरु होता. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता सुमारे ९ लाख मतदारांचे मॅपिंग होत नाही. यामध्ये कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील संख्या एक – एक लाखांच्या वर आहे. विरोधकांचे बोगस मतदानाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी यादीतील डेटाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एकाच मतदाराची नावे वेगवेगळ्या केंद्रांवर किंवा वॉर्डांमध्ये आहेत का, याची तांत्रिक तपासणी करणे. गावात किंवा शहरात न राहणाऱ्या व्यक्तींची नावे यादीतून वगळण्यासाठी बीएलओ कडे पाठपुरावा करणे. एकाच पत्त्यावर संशयास्पद रित्या जास्त मतदार नोंदणी असल्यास त्याचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करणे. प्रत्येक मतदाराचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी लिंक आहे याची खात्री करा, ज्यामुळे बनावट मतदानाला आळा बसेल. मागील निवडणुकांमधील मतदानाची आकडेवारी आणि यंदा झालेली नवीन नोंदणी यांचा तुलनात्मक अभ्यास करून ‘संवेदनशील’ भागांची ओळख करा आणि खासकरून अशा भागावर लक्ष केंद्रित करून त्याठिकाणची जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह सक्षम पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना दिल्या.
चौकट —
म्हणून विरोधक गल्ली- बोळात फिरत आहेत : आमदार क्षीरसागर यांचा टोला
विरोधकांना आता जनतेचा आधार राहिला नाही, त्यामुळे बोगस मतदानाचा आधार घेवूनच ते निवडणुकीत यश मिळविण्यासाठी गल्ली- बोळात फिरत आहेत, असा टोला लगावत त्यांच्या या मनसुब्यांना सुरुंग लावून बोगस मतदान कायमचे हद्दपार करून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, अशा सूचना देखील आमदार क्षीरसागर यांनी केल्या
यावेळी शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेवक आस्कीन आजरेकर यांनी मनोगते व्यक्त केली. यासंपूर्ण प्रक्रियेची माहिती एसआयआर समन्वय समितीचे प्रमुख अंकुश निपाणीकर यांनी दिली.
या बैठकीस महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका वंदना मोहिते, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक वैभव माने, नेपोलीयन सोनुले, जिल्हा समन्वयक विनायक साळोखे, शहरप्रमुख रणजित जाधव, परिवहन सदस्य सनी अतिग्रे, संजय गांधी निराधार योजना प्रमुख दीपक चव्हाण, किशोर घाटगे, रमेश खाडे, उदय भोसले, सुनील जाधव, निलेश हंकारे, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, सुरेश माने, अनिल पाटील, अर्जुन आंबी, चेतन शिंदे, मंदार पाटील, अश्विन शेळके, सुशील भांदीगरे, सौरभ कुलकर्णी, महिला आघाडीच्या पूजा भोर, गौरी माळदकर, गीता भंडारी, पूजा कामते, सना अत्तार, पूजा पाटील, युवतीसेनेच्या नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, निवेदिता तोरस्कर, वल्लरी पटेल आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!