गोकुळ संदर्भातील अंतिम सुनावणी व निर्णय उद्या

Spread the news

गोकुळ संदर्भातील अंतिम सुनावणी व निर्णय उद्या

­

 

आज दोन्ही बाजूंचे म्हणणे घेतले ऐकून

  •  

कोल्हापूर, दि. ५:
गोकुळ दूध संघासंदर्भात दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवार दि. पाच सुनावणी झाली. या सुनावणीत दोन्हीही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उद्या बुधवार दि. सहा पुन्हा अंतिम सुनावणी होऊन निकाल दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

याबाबत अधिक माहिती अशी, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व महाराष्ट्र सरकारने कायद्यात बदल करून केलेली प्रशासक मंडळाची नियुक्ती, याविरुद्ध गोकुळ दूध संघाचे संचालक व पुंगाव ता. राधानगरी येथील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज झालेल्या सुनावणी
गोकुळ दूध संघाच्या संचालकांच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. अभिषेक मनु सिंघवी, ॲड. आनंद लांडगे व ॲड. भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. वरिष्ठ वकील ॲड. मुकुल रोहतगी यांनी श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली. श्री महादेव दूध संस्थेच्यावतीने वरिष्ठ वकील ॲड. श्री. तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने ॲड. श्री. धर्माधिकारी यांनी काम पाहिले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!