खाशाबा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात स्थगितीबाबत नागराज मंजुळेंसह जिओला नोटिस

Spread the news

खाशाबा चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
स्थगितीबाबत नागराज मंजुळेंसह जिओला नोटिस
कोल्हापूर ः  न्यायालयात दावा सुरू असतानाही खाशाबा चित्रपटाचा ट्रेलर प्रर्दशित केल्याने चित्रपट स्थगितीच्या सुनावणीसाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शनला पुणे सत्र न्यायालयाने नोटिस बजावली आहे.
डिसेंबर 2024 पासून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी कॉफीराईटबाबत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा सुरू आहे.
खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे असून भारत सरकारच्या कॉपीराईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे आहे. या पुस्तकाच्या कॉपीराईटचा खाशाबा चित्रपटाचा दावा सुरू असतानाच  1 मे पासून चित्रपटगृहात खाशाबांचा  ट्रेलर प्रर्दशित करण्यात येत आहे.  याची दाखला  देत चित्रपट प्रदर्शन करण्यास स्थगितीसाठी  ॲड. रवद्र शदे व ॲड. सुवर्णा शदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात 2 मे रोजी अर्ज दाखल केला. न्यायालयाने अर्जाची तातडीने दखल घेत 8 मे रोजी तातडीच्या सुनावणीसाठी नागराज मंजुळे यांच्यासह ज्योती देशपांडे यांना नोटिसा पाठवल्या आहेत.
नागराज मंजुळे यांनी संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. लेखक दुधाणे म्हणाले की, जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांना आमचा विरोध नाही. मात्र मंजुळे यांनी माझ्यावर केलेल्या 5 कोटीच्या अब्रुनुसान दाव्यातूनच चित्रपट माझ्या पुस्तकाावर आधारित असल्‌याचे सिध्द होते. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने अधिक भाष्य मला करता येत नाही.
चौकट
मंजुळेंचे शपथपत्र कथा दुधाणे यांचीच
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी लेखक संजय दुधाणे यांच्यावर 5 कोटीचा अब्रुनुकसान दावा दाखल केला असून या दाव्यातील शपथपत्रातच कथा ही दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे पुरावे मंजुळे यांनी जोडले आहेत.
मंजुळे यांच्या  दाव्यातच खाशाबा चित्रपट हा सोशल मिडियाच्या माहिती आधारे चित्रपट निर्माण करीत असल्याचे मंजुळे यांनी शपथपत्र दिले आहे. या शपथपत्रातील पान. क्रं. 215 व 215 वर दुधाणे यांच्या नावाचा खाशाबांच्या कथालेखक म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. याशिवाय मंजुळे यांनी जोडलेले तब्बल 4 संदर्भ  हे दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारीत आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. राजेंद्र मकोटे, समन्वयक – खाशाबा जाधव फाऊंडशेन मो. 9881191220

Spread the news

You may also like

error: Content is protected !!