ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत शिवाजीराव शिंदे पॅनेल विजय
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवाजीराव शिंदे यांच्या पॅनेलने दणदणीत विजय मिळवला.कोल्हापूर जिल्ह्यातील मंगळवार पेठेतील ते रहिवासी असून कुणाल शिंदे यांचे काका आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे तसेच आमदार हितेंद्र ठाकूर तसेच खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार कथोरे, आमदार रुपेश म्हात्रे तसेच महायुतीतील सर्वच नेते त्यांच्या अनमोल सहकार्य लाभले.
शिवाजीराव शिंदे हे मूळचे आहेत. कोल्हापूरच्या ठाणे जिल्ह्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेले व तेथे प्रथम महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन येथे निवडणूक लढवून संचालक झाले व अध्यक्षपदाचा मान ही भूषवला त्यानंतर हळूहळू ठाणे जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव लौकिक केले व एक वेगळाच ठसा उमटवला.. नंतर ठाणे जिल्हा बँकेचे संचालक होण्याचा मान ही त्यांनी पटकावला तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवले हे काम करत असताना तेथील सभासदांना व मतदार राजांना कधीही त्यांनी कोणत्याही कामांमध्ये नाही म्हणलं नाही येईल त्याला नेहमीच मदत करत राहिले बँकेच्या दृष्टीने आज महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर दोनची बँक म्हणून ठाणे जिल्हा बँकेची ओळख आहे यावेळी अध्यक्ष पद असताना त्यांनी बँकेला भरपूर नफा करून दिला आहे तसेच कोकण विभागीय फेडरेशन चे अध्यक्ष पद आज त्यांच्याकडे आहे.. महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्स मध्ये जेव्हा ती संचालक झाले व चेअरमन झाले तेव्हा त्यांनी संस्थेतील बऱ्याच लोकांकडून कर्ज वसुली करून संस्था चांगल्या प्रकारे सुरू ठेवली.. आज बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये किंगमेकर ची भूमिका घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा बँक निवडणूक लढवली गेली व ती सहकार क्षेत्र पॅनेल विजय करण्यात माननीय श्री शिवाजीराव शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे..