जैन समाजाचे मानवजातीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे चिरंतन राहील
मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कसबा सांगावमध्ये श्री. जिन सहस्त्रनाम आराधना महोत्सवात घेतले ऋषीमुनींचे दर्शन
कसबा सांगाव, दि. २७:
जैन समाजाचे मानवजातीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान हजारो वर्षे चिरंतन राहील, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कसबा सांगाव ता. कागल येथे सुरू असलेला श्री. जिन सहस्त्रनाम आराधना महोत्सव व विश्वशांती महायाग हा सोहळा पवित्र आहे. जैन समाजाच्या अध्यात्मिक परंपरेला उजाळा देणारा हा महोत्सव शांतता, अहिंसा व विश्वकल्याणाचा संदेश देणारा ठरला आहे, असेही ते म्हणाले.
कसबा सांगाव ता. कागल येथील श्री. १००८ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर प्राचीन जैन मंदिरात आयोजित सोहळ्याला मंत्री श्री. मुश्रीफ यांनी भेट देऊन ऋषीमुनींचे दर्शन घेतले.
मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, जैन धर्माचे तत्त्वज्ञान संपूर्ण मानवजातीला आणि पर्यायाने जगालाच सत्य आणि अहिंसा हा मूलमंत्र देते. जैन समाजाचे हे तत्त्वज्ञान संपूर्ण मानव जातीलाच सुखसमृद्धी आणि कल्याणाकडे नेणारे आहे. हे तत्त्वज्ञान हजारो वर्षे चिरंतन राहील, एवढे ते महान आहे.
यावेळी स्थानिक प्रमुखांसह जैन धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………..
कसबा सांगाव ता. कागल श्री जिन सहस्त्रनाम आराधना महोत्सव व विश्वशांती महायाग या पवित्र धार्मिक कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऋषिमुनींचे दर्शन व आशीर्वाद घेतले.




