*शिव आरोग्य सेना गावागावात पोहचली पाहिजे- उपनेते संजय पवार साहेब*
*हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या २०% राजकारण व ८०% तत्वा नुसार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार व शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष किशोरजी ठाणेकर साहेब यांच्या सूचनेनुसार शिव आरोग्य सेना कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक सर्किट हाऊस कोल्हापूर येथे पार पडली.*
*शिव आरोग्य सेना कार्य करते, गरजू रुग्णांना मदत असुदे किंवा कोणत्याही आरोग्य क्षेत्रातील कार्य करणाऱ्या आरोग्य दूत यांना आरोग्य सेनेच्या वतीने सहकार्य करण्यात येते.*
*यावेळी शिवसेना पक्ष वाढीसाठी व शिव आरोग्य सेनेचे कार्य जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात पोहचवण्याचा निर्धार ह्यावेळी करण्यात आला तसेच मागील वर्षाच्या आरोग्य सेनेचा आढावा घेण्यात आला व काही नवीन निवडी करण्यात आल्या.*
*यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व याप्रसंगी जिल्हाप्रमुख विराज पाटील, जिल्हाप्रमुख संजय चौगले, नगरसेवक सुनील मोदी, शहरप्रमुख विशाल देवकुळे उपशहर प्रमुख राहुल माळी, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये खा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिव आरोग्य सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ उत्तम माळी, जिल्हाअध्यक्ष डॉ संतोष पाटील, ग्रामीण जिल्हाअध्यक्ष डॉ दिग्विजय पाटील, सचिव डॉ किरण पवार, जिल्हा समन्वयक ओंकार उर्फ विकी मोहिते, सचिव गोविंद वाघमारें, राधानगरीचे डॉ राजेंद्र महाडिक, डॉ संदीप पाटील, गगनबावडा चे डॉ अजित पाटील, कागलचे डॉ रमेश सूर्यवंशी, डॉ के एम पाटील, डॉ पूजा टाकमारे, शहर समन्वयक रितेश पाटील, सचिव साताप्पा शिंगे, उपजिल्हा संघटक ज्ञानेश्वर शिरावडेकर, तालुळा समन्वयक सर्वस्वी दयानंद भोपळे (आजरा), संतोष माजगावकर (पन्हाळा), निलेश म्हेतर (गगनबावडा), विजय रणदिवे (कागल) यासंह शिवसैनिक उपस्थित होते.*



