विवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच पुणे शिक्षक मतदार संघाचा आमदार असेल
नामदार चंद्रकांत दादा पाटील
कोल्हापूर दि. 21 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने पुणे शिक्षक मतदार संघ आणि पदवीधर मतदार संघात जेव्हा जेव्हा विक्रमी मतदारांची नोंदणी केली. तेव्हा तेव्हा संस्थेने आपल्या हक्काचा आमदार निवडून दिल्याचा इतिहास आहे. संस्थेचे मुख्य् कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांनी पुणे शिक्षक मतदार संघ पिंजून काढून सर्वाधिक मतदारांची नोंद केल्याने तसेच उरलेल्या वेळेत विक्रमी संख्येने मतदार नोंदणी केल्यास हजारो गुरुदेव कार्यकर्त्यांचे स्वप्न् पूर्ण होईल. विवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच पुणे शिक्षक मतदार संघाचा आमदार असेल. असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त् केला.
येथील विवेकानंद कॉलेजच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन मध्ये शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणी मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे हे होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले, शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर या सरकारने नवीन शैक्षणिक धोरण राबविल्याने शिक्षक पदांवर कोणतेही गंडांतर येणार नाही व कोणतेही पद कमी होणार नाही. या सरकारने साडे पाच हजार प्राध्यापकांची भरती केली आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांचे प्रलंबित प्रश्न् सोडविले आहेत. मुलींना व्यावसाईक शिक्षणामध्ये पूर्ण फी माफीचे धोरण राबविले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय वाढली आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी भरती बंदी उठवून लवकरच सर्व संस्थांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. कमवा व शिका या योजनेची व्याप्ती वाढवून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आर्थिक प्राप्ती करुन देण्याचा विचार सुरु आहे. त्याबरोबरच एकल माता योजना हा एक महत्वाचा सामाजिक टप्पा असून लवकरच ही योजना अंमलात येणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभ गावडे यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, 2005 अगोदरच्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व्यापक काम सुरु असून शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना़ मिळवणे हे प्रमुख ध्येय आहे. शिक्षकांच्यावर लादली जाणारी अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी विधानपरिषदेमध्ये शिक्षकांच्या हक्काचा कर्तबगार सदस्य् जाणे गरजेचे आहे. शिक्षकांचे सर्व प्रलंबीत प्रश्न् पुढील सहा वर्षात सोडविणे यासाठी सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक बंधू भगिनी एकत्र येऊन आपल्या पाठीशी उभे राहतील असा ठाम विश्वास त्यांनी व्य्क्त् केला.
याप्रसंगी श्री कौस्तुभ गावडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद एस. हुजरे यांच्या हस्ते
साडे पाच हजार नवीन मतदार नोंदणी अर्ज नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सोपविण्यात आले.
सुत्रसंचालन प्रा.अशोक पाटील व डॉ. सुप्रिया पाटील, डॉ कविता तिवडे यांनी केले. आभार प्रा.अशोक पाटील पोहाळेकर यांनी मानले.
या वेळी भाजपा राज्य् उपाध्यक्ष श्री. शेखर इनामदार, मित्र पदवीधर संघाचे माणिक पाटील चुयेकर, नितीन पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी नेते श्री हितेंद्र साळुंखे, मान्यवर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पदवीधर, मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.



