Spread the news

*शिक्षक समन्वय संघ*
*30 जून 2026 पासून सामुदायिक बेमुदत रजा आंदोलन*

­

 

*सामुदायिक रजा टाकून राज्यातील सर्व शिक्षकांनी 30 जून पासून आझाद मैदानावर दाखल व्हा*
22 जून पासून आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाची योग्य ती दखल घेतली नसल्याने मंगळवार दि 30 जून पासून राज्यातील सर्व शिक्षक बेमुदत रजा टाकून आझाद मैदानावर दाखल व्हावे, दररोज मरण यातना भोगण्यापेक्षा एकदाच मैदानावर शासनाशी संविधानिक व अहिंसा च्या मार्गाने आपण लढा देऊया, मागील वर्षी याच पद्धतीने आपण सर्वांनी मिळून लढा यशस्वी केला होता,आपल्या एकतेची ताकद आपण मैदानावर दाखवून देऊ
आपल्या हक्काच्या रजा कोणी नाकारू शकत नाही आपल्या संस्थेला विश्वासात घेऊन त्यांना समजावून सांगावे,जर एकाच दिवशी पूर्ण मैदान भरले तर निश्चितच आपल्याला यश मिळेल,
तुमच्या सर्वांच्या उपस्थितीवर वरीष्ठ नेते मैदानावर येऊ शकतात,
आपल्याला आपला प्रश्न महत्वाचा आहे,याबाबत कोणतीच तडजोड होणार नाही,
आपण सर्वांनी येणारे तीन दिवस आपल्या भागातील मंत्री, खासदार,आमदार, लोकप्रतिनिधी, सत्तेतील नेते यांना भेटून आपल्या प्रश्नांबाबत भेट घेऊन चर्चा करावी आणि त्यांना कल्पना द्यावी की आम्ही सर्वजण रजा टाकून मुंबई आझाद मैदानावर जात आहोत,
आपल्या विभागातील उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना प्रमुख समन्वयकांनी पत्रे देऊन रजा आंदोलनाच्या बाबतीत माहिती देण्यात यावी,
आपल्या विभागातील ,जिल्ह्यातील, तालुक्यातील संस्था प्रमुख, मुख्याध्यापक, यांना यांची कल्पना देऊन रीतसर पत्र देण्यात यावे, तसेच मीडियावर विविध माध्यमातून या आंदोलनाला प्रसिद्धी देण्यात यावी, प्रत्येक शिक्षक हा समन्वयक असून आपली स्वतः ची समजून नियोजन करावे,
आपल्या भागातील विविध संघटना प्रतिनिधी यांना या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्यासाठी विनंती करावी
*एकवेळ एकीचे बळ*

  •  

*माझा पगार माझी जबाबदारी*
हेच ब्रीद वाक्य एकीचे असेल, ना कोणी मोठा ना कोणी छोटा या भूमिकेतून आपण कोणाच्याही निमंत्रणा ची वाट न पाहता 30 जून सामुदायिक रजा देऊन मुंबई येथे आझाद मैदानावर दाखल व्हावे ही विनंती

खंडेराव जगदाळे, पुंडलिक रहाटे, संजय रंगारी संजय डावरे,भारत जामनिक, वैद्यनाथ चाटे,अजय थुल भानुदास लहाने पवनसिंह,उमेश तिवारी,गजानन मद्रेवार


Spread the news

You may also like

error: Content is protected !!