चंद्रकांत दादा पाटील आज स्वीकारणार भाजप कार्यालयात वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोल्हापूर
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे गुरुवार दिनांक 12 जून रोजी सायंकाळी कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील भाजपच्या कार्यालयात वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस 10 जून रोजी पुण्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. गेले काही वर्षे दादांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रम राबवत केला जातो. या उपक्रमाला दरवर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. या प्रतिसादातूनच 35 हजार झाडांची लागवड, 50 हजार शेतकऱ्यांना खत, सावली सेंटरला मदत, कोरोना काळात मदत करण्यात आले.
यंदाही दादांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमानेच साजरा करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच ते आठ या वेळेत ते भाजपच्या जिल्हा कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
यंदा महिलांच्या आरोग्यासाठी संवेदनशील, सतर्क आणि समर्पित अशी संकल्पना घेण्यात आली आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते व इतरांनी शुभेच्छासाठी पुष्पगुच्छ आणण्यापेक्षा या संकल्पनेला मदत करावी असे आवाहन भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांनी केले आहे.