पुणे विभागातील पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय वारणेत! ८० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू: आमदार विनय कोरे

Spread the news

पुणे विभागातील पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय वारणेत! ८०
जागांसाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू: आमदार विनय कोरे

­

 

वारणानगर :वारणा शिक्षण मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. वारणानगर येथे ‘तात्यासाहेब
कोरे इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्स’ या पशुवैद्यकीय महाविद्यालयास केंद्र शासनाकडून अधिकृत मान्यता
(LoP) प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, पुणे विभागातील हे पहिले खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय ठरले असून, यामुळे
पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दारे उघडली आहेत.
ही महत्त्वाची माहिती वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी दिली. यावेळी वारणा शिक्षण
मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी,वारणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉक्टर डी. टी शिर्के, वारणा
संस्थेचे एन. एच. पाटील, उपस्थित होते. या महाविद्यालयाला दरवर्षी ८० विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून येथेप्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन (B.V.Sc. & A.H.) ही पदवी
मिळणार आहे. या महाविद्यालयासाठी ‘नीट’ (NEET) पात्रता आवश्यक असणार आहे. व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (नागपूर) यांच्या तज्ज्ञ समित्यांनी या प्रकल्पाची दोनदा पाहणी करून सर्व निकषांची काटेकोर तपासणी केली. महाविद्यालयातः अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज पशुवैद्यकीय रुग्णालय, तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे.
भारताचा जागतिक दूध उत्पादनातील वाटा २४-२५% इतका मोठा असूनही, देशात पशुवैद्यकीय डॉक्टरांची मोठी कमतरता
आहे. महाराष्ट्रात सध्या केवळ ५ शासकीय महाविद्यालये असून दरवर्षी जेमतेम ४०० च्या आसपास विद्यार्थी पदवीधर
होतात. राज्यात पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि प्राण्यांचे प्रमाण १ : १६,४४९ इतके व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर वारणेतील या
नवीन महाविद्यालयामुळे दरवर्षी ८० नवीन तज्ज्ञ डॉक्टर तयार होतील, ज्यामुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा
बळकट होण्यास मदत होईल.
“वारणा शिक्षण मंडळाची केजी टू पीएचडीपर्यंतची उज्ज्वल परंपरा आहे. आता पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या
माध्यमातून आम्ही ग्रामीण व शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देत आहोत.”
डॉ. विनय कोरे
(अध्यक्ष, वारणा समूह)

  •  

·वारणा विद्यापीठासह वारणा समुहातील शैक्षणिक सुविधा-
इंजिनिअरिंग UG/PG/P.hd. – सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्यूटर सायन्स, केमिकल, ई अँण्ड टी.सी, सायबर सिक्यूरिटी,
इलेक्ट्रिकल, कॉम्प्यूटर सायन्स अँण्ड बिझनेस सिस्टिम … एम.बी.ए., एम.सी.ए … इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉम्प्यूटर
सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आर्टिफीशीयल इंटेलिजन्स अँण्ड मशीन लर्निंग … आर्किटेक्चर B.Arch …
फार्मसी UG/PG/P.hd. बी. फार्म, एम. फार्म, फार्म, डी, डिप्लोमा-डी. फार्म … आर्टस, कॉमर्स, सायन्स
UG/PG/P.hd.,बी.बी.ए … बी.सी.ए … डेंटल … बीडीएस … एमडीएस … नर्सिंग. लॉ.एल.एल.बी, बी. ए.एल.एल.बी.
बी.बी.ए.एल.एल.बी … बी. एड … औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेल्डर, मेकॅनिकल ड्राप्टसमन, सिव्हिल ड्राप्टसमन, कॉम्प्युटर
ऑपरेटर अण्ड प्रोग्रॅम असिस्टंट, मोटर मॅकॅनिक अॅण्ड व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, प्लंबर,
स्टेनोग्राफर (इंग्लिश/मराठी), कॉस्मेटोलॉजी … उच्च माध्यमिक आर्टस, कॉमर्स, सायन्स, व्यावसायिक, मिलीटरी …
माध्यमिक-मराठी-गुरुकुल, सेमी-इंग्रजी, इंग्रजी, मिलीटरी, सी.बी.एस.सी …. प्राथमिक मराठी, इंग्रजी …


Spread the news

You may also like

error: Content is protected !!