भर पावसात रविवारी रात्री मिरजकर तिकटी येथे फुटबॉल शौकिनांचा महापूर, छत्र्या-रेनकोट घेवून फुटबॉल प्रेमींनी लुटला विश्‍वचषक अंतिम सामन्याचा आनंद, भाजप युवा मोर्चाच्या उपक्रमाला उदंड यश

Spread the news

दि. २०/०७/२०२६

­

 

*भर पावसात रविवारी रात्री मिरजकर तिकटी येथे फुटबॉल शौकिनांचा महापूर, छत्र्या-रेनकोट घेवून फुटबॉल प्रेमींनी लुटला विश्‍वचषक अंतिम सामन्याचा आनंद, भाजप युवा मोर्चाच्या उपक्रमाला उदंड यश*

  •  

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी रविवारी रात्री कोल्हापुरात जय्यत तयारी करण्यात आली होती. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथं भव्य स्क्रीन लावण्यात आली होती. कृष्णराज महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह कोल्हापूरच्या हजारो फुटबॉल शौकिनांनी भर पावसात फुटबॉल सामन्याचा आनंद लुटला. छत्र्या-रेनकोट घेवून आलेल्या फुटबॉल प्रेमी तरूणांचा जणू मिरजकर तिकटीला महापूर लोटला होता.
फुटबॉलवेडे कोल्हापूर, रविवारी रात्री विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाले होते. अर्जेंटिना विरुद्ध स्पेन यांच्यातील अंतिम सामना रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता सुरु झाला. हा सामना भव्य स्क्रीनवर बघता यावा, यासाठी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून मिरजकर तिकटी येथे व्यवस्था केली होती. त्यामुळे रविवारी रात्री साडेअकरा वाजल्यापासून शेकडो फुटबॉल शौकिनांची पावले मिरजकर तिकटीकडे वळू लागली. १२ वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी परिसर गर्दीने खचाखच भरुन गेला. अनेकांनी आपल्या आवडत्या मेस्सीच्या विजयाचा आनंद लुटण्याचे मनोमन ठरवले होते. त्यामुळे अनेकांनी अर्जेंटिना संघाच्या जर्सी परिधान केल्या होत्या. भाजपयुवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनीही अर्जेंटिना संघाची जर्सी घालून, मिरजकर तिकटी येथे उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते हजर होते. अंतिम सामन्याचे भव्य स्क्रिनवर थेट प्रक्षेपण सुरू झाले आणि वरूणराजानेही हजेरी लावली. पण छत्र्या आणि रेनकोट घेवून आलेल्या फुटबॉल शौकीनांच्या उत्साहावर यत्किंिचतही परिणाम झाला नाही. उलट भर पावसात प्रचंड उत्साहात कोल्हापूरच्या फुटबॉल शौकिनांनी सामन्याचा आनंद लुटला. संपूर्ण सामना निर्धारित वेळेत गोलशून्य राहिला. स्पेनच्या खेळाडूंची वेगवान आक्रमणे आणि अर्जेटिनाचा बचावात्मक पवित्रा, यामुळे मेस्सी समर्थकांमध्ये नाराजी पहायला मिळाली. हा सामना स्पेनने १ विरुध्द ० गोलने जिंकून विश्‍वचषकावर दुसर्‍यांदा आपले नाव कोरले. पण अखेरच्या क्षणापर्यंत कोल्हापुरातील फुटबॉल शौकीनांनी मिरजकर तिकटी परिसरात ठिय्या मारून अंतिम सामना अनुभवला. भाजप युवा मोर्चाच्या वतीने मिरजकर तिकटी येथे राबवलेल्या उपक्रमाला उदंड यश लाभले


Spread the news

You may also like

error: Content is protected !!