डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला गुणवंतांची पहिली पसंती

Spread the news

*डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला गुणवंतांची पहिली पसंती*

­

 

कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दिली आहे. विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग शाखेसाठी ९७.२० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या साक्षी जांभळे हिने प्रवेश घेतला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी नम्रता खाडे (९३.८० टक्के), सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अनुष्का पडवळ (९५.४० टक्के), तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी यशश्री खडके (९५ टक्के) यांनी प्रवेश घेतला आहे.

  •  

या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता आणि पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, ‘डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकने सातत्याने उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळेच गुणवंत विद्यार्थी या संस्थेला प्राधान्य देत आहेत. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित सुविधा आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी डी. वाय. पाटील ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहे.

प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी संस्थेतील विविध शैक्षणिक व कौशल्यविकास उपक्रमांची माहिती दिली. तंत्रशिक्षण मंडळाने पॉलिटेक्निकला ‘एक्सलंट’ श्रेणी प्रदान केली असून हा दर्जा कायम राखण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, विभागप्रमुख डॉ. पी. के. शिंदे, प्रा. एस. बी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. शीतल साळोखे, प्रा. अजय बंगडे, प्रा. अर्चना जोशी, प्रा. राज अलास्कर, विजय पाटील, दीपाली पाटील, सागर पाटील आणि विकास पाडळकर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!