श्री कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धार

Spread the news

श्री कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा
शिक्षकांनी केला ठाम निर्धार
श्री स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर जिल्हा  शिक्षकांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न.
कोल्हापूर दि. 26 :  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर विभागाच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला ‘कोल्हापूर जिल्हा शिक्षकांचा निर्धार मेळावा’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला. आगामी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत श्री कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची पताका फडकवण्यासाठी सर्व शिक्षकांनी संघटित होऊन काम करण्याचा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यात बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, यापूर्वी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने तीन वेळा पुणे विभागाचा शिक्षक आमदार निवडून दिला आहे.  आणि या प्रत्येक वेळी श्री  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षकांची नेहमीच मोलाची साथ लाभली आहे. याच विश्वासाच्या जोरावर आणि गुरुदेव कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांच्या बळावर आगामी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत निश्चितपणे ऐतिहासिक विजय संपादन करण्याचा निर्धार करुन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले
या महत्त्वपूर्ण मेळाव्यामध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे प्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे, संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर जिल्हा प्रचार प्रमुख श्री. भूपाल कुंभार, श्रीमती ए.आर. पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या प्राचार्या डॉ. श्रुती जोशी, सातारा जिल्हा विभागप्रमुख मा. शशिकांत काटे, आजीव सेवक अजितकुमार देसाई, प्राचार्य पी.एस.चव्हाण, मा.आर.डी.पाटील, श्री. विरेन भिर्डी, मा. हुसैन पठाण या मान्यवरांनी आपल्या मनागेतामधून, श्री कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी सर्व शिक्षकांनी जीवाचे रान करुन विक्रमी शिक्षक मतदार नोंदणी केली आहे.  या कामगिरीच्या जोरावर आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी शिक्षक मित्र श्री कौस्तुभ गावडे यांनी, सन 2005 अगोदरच्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना विनाअट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी व्यापक काम सुरु असून शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सन्मानाने जीवन जगण्यासाठी जुनी पेन्शन योजना़ मिळवणे हे प्रमुख ध्येय आहे.  शिक्षकांच्यावर लादली जाणारी अशैक्षणिक कामे रद्द करण्यासाठी विधानपरिषदेमध्ये शिक्षकांच्या हक्काचा कर्तबगार सदस्य् जाणे गरजेचे आहे.  दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांच्या सेवा सुरक्षेला बाधा न आणता TET सक्ती रद्द करावी, आवश्यक प्रशिक्षण आणि उपाययोजना यासाठी प्रयत्न करणे, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया वर्षभर नियमितपणे सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करणे, जेणेकरून विविध कारणांमुळे रिक्त झालेली शिक्षक पदे वेळेत भरली जातील आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.  शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचारापासून मुक्त करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आणि आवश्यक विषय शिक्षकांची नियुक्ती यासाठी प्रभावी पाठपुरावा करणे, विशेषतः गणित, विज्ञान, इंग्रजी, संगणक, कला, क्रीडा आणि व्यावसायिक विषयांतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यावर भर देणे, अनुदानास पात्र संस्था व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा करणे,  20%, 40%, 60%, 80% अशा टप्प्यांतील अडचणी दूर करून पात्र संस्थांना एकसमान 100% पूर्ण अनुदान देण्याच्या मागणीसाठी प्रयत्न करणे, शिक्षकांचा मुख्य वेळ अध्यापन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध राहावा यासाठी शिक्षकांवरील अनावश्यक अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, राष्ट्रीय शेक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे कार्यभार (workload) कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम प्राध्यापक पदसंख्येवर होऊ नये, यासाठी प्राध्यापक हिताचा समतोल राखणारे धोरण व योग्य मनुष्यबळ नियोजनासाठी पाठपुरावा करणे, कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेतील अडचणींचा अभ्यास करून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणे, आश्रमशाळांमधील इमारत, स्वच्छता, पाणी, निवास, शैक्षणिक सुविधा आणि इतर मूलभूत गरजांवर विशेष लक्ष देणे. 2026 मध्ये प्रस्तावित/घेतलेल्या Third-Party Audit संदर्भातील प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी व त्यातून आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे, इंजिनिअरींग, डिप्लोमा, वैद्यकीय, कृषी, व्यावसायिक शिक्षण या अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्ती वेळेत मिळाव्या यासाठी पाठपुरावा करणे, महिलांच्या रजः स्त्राव काळात गरजेनुसार विशेष रजा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणे, ITI instructors साठी Faculty Development, Training of Trainers आणि नवीन age courses यासंदर्भातील मुरु असलेल्या कामांना गती मिळावी, उद्योगाभिमुख प्रशिक्षण वाढावे आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्ये मिळावीत यासाठी प्रयत्न करणे, RTE अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काशी संबंधित शाळांना मिळणारे अनुदान शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस किंवा निश्चित वेळापत्रकानुसार प्राप्त व्हावे, यासाठी स्पष्ट धोरण व कालबद्ध निधी वितरणासाठी पाठपुरावा करणे, सर्व कार्यरत शिक्षकांच्या आरोग्य विम्याची सुविधा कॅशलेस व्हावी, यासाठी पाठपुरावा करणे असे शिक्षकांचे सर्व प्रलंबीत प्रश्न् पुढील सहा वर्षात सोडविण्यासाठी सर्व शिक्षक माझ्या पाठीशी ठाम उभे असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन केले.
या निर्धार मेळाव्याला कोल्हापूर जिल्ह्यातील 30 शाखांमधील हजारो शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये शिक्षकांचा बुलंद स्वर, आमचा आमदार कौस्तुभ सर आणि कौस्तुभ गावडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है या सारख्या घोषणांनी सभागृह दुमदुमुन गेले.  शिक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे या मेळाव्याने निवडणुकीपूर्वीच विजयाचे रणशिंग फुंकल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!