लिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृहासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Spread the news

लिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृहासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

­

 

कोल्हापूर -: ‘लिंगायत माळी समाजाने समाजाभिमुख उपक्रम राबवित कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाने संघटित होऊन आता सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणीचे काम हाती घेतले आहे. या केंद्रासाठी भरीव मदत करू’ अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

  •  

लिंगायत माळी समाज, कोल्हापूर जिल्हातर्फे उजळाईवाडी येथे ‘कै. नारायण तुकाराम माळी सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह’ इमारतीचा पायाभरणी समारंभ शनिवारी (३१ ऑक्टोबर २०२६) आयोजित केला होता. आमदार अशोक माने, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, सानिका आवाडे, इचलकरंजीतील नगरसेविका पूनम माळी, पंचायत समिती सदस्य डॉ. शिल्पा हजारे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, वीरशैव बँकेचे अध्यक्ष सतीश घाळी, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष राहुल नष्टे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ दिमाखात पार पडला. या पायाभरणी समारंभासाठी समाज बांधवानी मोठया संख्येने गर्दी केली होती. पायाभरणी समारंभात समाजातील मान्यवरांनी पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम बांधकामासाठी घोषित केली. त्या साऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

आमदार अशोकराव माने यांनी ‘जो समाज संघटित असतो, तोच समाज मोठा होतो. लिंगायत माळी समाज हा जिल्हाभर आहे. संघटित होत सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित करुन वेगळेपण दाखविले आहे. या समाजाच्या सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणीसाठी एक लाख रुपयांची देणगी देत आहे.’ शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम यांनी, ‘लिंगायत समाजाच्या कार्याला आपले नेहमी सहकार्य आहे. सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह बांधकामासाठी दोन ट्रक सिमेंट पोती देऊ. येत्या वर्षभरात इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल या पद्धतीने नियोजन करावे. इमारत बांधकामासाठी आपले सहकार्य राहील.’ असे सांगितले. या केंद्राच्या उभारण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, सानिका आवाडे, सरपंच आंबवडे, डॉ. संदीप हजारे यांनीही बांधकामासाठी मदतीची ग्वाही दिली.

लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी समाजातर्फे राबविण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. ‘कोल्हापुरात कै. नारायण माळी सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणी हे समाजाचे स्वप्न आहे. या बांधकामासाठी आतापर्यंत जवळपास तीस लाख रुपये जमा झाले आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती बांधकामाला विविध माध्यमातून मदत केली आहे. सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणीसाठी समाजबांधवांनी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

’याप्रसंगी समाजाचे मार्गदर्शक, बांधकाम समितीचे अध्यक्ष सीतारामबापू चौगुले, इंजिनीअर अण्णासाहेब माळी, प्राचार्य जी. पी. माळी, रेंदाळ माळी समाज संघटनेचे अध्यक्ष एम. बी. माळी, यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम, कारखानदार प्रभाकर कुलगुडे, राजेंद्र माळी, गोरख माळी, महिला आघाडीच्या वंदना माळी, उपाध्यक्ष वैशाली माळी कार्याध्यक्ष विद्या माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, पंचायत समिती सदस्य विजय माळी, गोरख माळी, सुरेश जांभुरे, श्रीनिवास दुधगावकर, गणपत बेलकुड, अशोक माळी, इचलकरंजी लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष रमेश माळी, सदाशिव बुभणे, अभिजीत माने, आदी उपस्थित होते. अनिल माळी यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!