फुटबॉल हंगाम कार्यक्रम जाहीर करा /मुलांच्या स्पर्धा घ्या /ज्येष्ठांना तिकिटात सवलत द्या =नागरिक कृती समितीची मागणी
——————————–
कोल्हापूर – १ डिसेंबर पासून चालू होणाऱ्या कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाच्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करावा जेणेकरून फुटबॉल संघ नाही आर्थिक दृष्ट्या सोयीचे होईल तसेच नवोदित खेळाडू तयार होऊन त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी फीफा नवीन नियमानुसार १३/ १५ / व १७ वर्षा खालील मुले व मुलींच्या संघांच्या स्पर्धांचे आयोजन करावे त्यामुळे स्थानिक संघांना नवनवीन खेळाडू तयार होऊन मिळतील
गेली दोन वर्ष के एस ए व अध्यक्ष मालोजी राजे छत्रपती यांचे कडे ज्येष्ठ नागरिकांनास्पर्धा पाहण्यासाठी तिकिटामध्ये नाममात्र शुल्क आकारणी करून विहित कालावधीत पास द्यावेत अशी मागणी केली आहे त्यावर अद्याप काहीच निर्णय घेतलेला नाही तरी यंदाचा हंगाम चालू होण्यापूर्वी नाममात्र शुल्क आकारून पास द्यावे अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने के एस ए चे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली
याबाबत माणिक मंडलिक यांनी मागण्या रास्त आहेत ही निवेदन कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये ठेवून त्यावर निर्णय घेऊन आपणास कळवतो असे सांगितले
ज्येष्ठ नागरिकांचा लाक्षणीय सहभाग असणाऱ्या या शिष्टमंडळामध्ये अशोक पोवार ,रमेश मोरे ,राजेंद्र घोणे , विष्णुपंत देसाई चंद्रकांत सूर्यवंशी अच्युतराव साळुंखे सुनील मोहिते बाबासाहेब पोवार ,चंद्रकांत पाटील ,आप्पासाहेब साळोखे ,बाळासाहेब माळी ,रवी कांबळे प्रभाकर पाटील ,नारायण खुपेरकर ,अनंत पाटील ,महेश जाधव ,राजाभाऊ मालेकर ,विजय जाधव सर , सुशांत चव्हाण , लहूजी शिंदे ,प्रभाकर पायमल ,विलासराव मेथी फिरोज सरगुर , मंगेश जाधव , नंदू नलवडे , बबन बिरंजे ,बाबासो महालकरी ,दिनकर घाटगे , मुकेश पोवार , रामभाऊ देवणे , संजय जांभळे आदिसह नागरिक मोठ्या संख्येने हजर होते
——————————–



