नागरिकांच्या तक्रारी नको;काम दर्जेदार झालंच पाहिजे:आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना..

Spread the news

नागरिकांच्या तक्रारी नको;काम दर्जेदार झालंच पाहिजे:आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना..
गांधी मैदान ते दुधाळी ड्रेनेज लाईन कामाची मनपा अधिकाऱ्यांसमवेत पहाणी; महाकालीच्या पालखी वेळी गैरसोय नको म्हणून काम २८ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना..
कोल्हापूर:-
कोल्हापूरातील गांधी मैदान परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचे निर्गतीकरण करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून मंजूर निधीतून गांधी मैदान ते दुधाळी पेवेलियन मार्गावर दयावान ग्रुप जवळ सुरु असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाची आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांसह पहाणी केली.
यावेळी कामाच्या बाबतीत कसलीही तक्रार खपवून घेतली जाणारं नाही, काम दर्जेदार करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
सदर परिसरात महाकाली देवीचे मंदिर असून महाकाली देवीचा सध्या उत्सव सुरू आहे. अनेक भाविक दररोज येथे दर्शनासाठी येतात, तसेच येत्या दि. २८ रोजी महाकालीचा पालखी उत्सव संपन्न होत आहे. तोपर्यंत हे काम पूर्ण झालेच पाहिजे आणि पालखी मार्गात कसल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये अशा सक्त सूचना आमदार क्षीरसागर यांनी ठेकदार आणि मनपा अधिकाऱ्यांना केल्या. तसेच सदर मार्गावर काम सुरु असताना पाईपलाईन ला लागलेली गळती तात्काळ दुरुस्त करण्यास सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे,शहरप्रमुख रणजित जाधव, महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे,युवासेना सरचिटणीस सौरभ कुलकर्णी,शैलेंद्र गवळी,मिलिंद साळोखे,बंटी साळोखे,
शहर अभियंता रमेश मस्कर,उपशहरअभियंता महादेव फुलारी, जयवंत पवार आदी..

Spread the news

You may also like

error: Content is protected !!