युनिक ऑटोमोबाईल्स फोक्सवॅगन कोल्हापूर मध्ये नवीन तायगुणचे अनावरण करण्यात आले. या कार चे अनावरण प्रमुख पाहुणे श्री प्रीतम शहा (व्हाईस प्रेसिडेंट, गो डिजिट जनरल इन्शुरन्स), श्री किंगशुक दाम (सेल्स एरिआ मैनेजर फोक्सवॅगन), श्री शंतनू मांजरेकर (सीईओ युनिक ग्रुप) व श्री सौरभ ईन्दूलकर (जीएम सेल्स फोक्सवॅगन कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले.
नवीन तायगुण मध्ये ऑल वेदर एल ई डी हेडलाईट, डी आर एल ,फ्रंट आणि रिअर इल्यूमिनेटेड लोगो, कनेक्टेड टेललाइट्स, सिक्वेन्शियल इंडिकेटर्स, अलॉय व्हील्स आणि ईतर फिचर्स यांचा समावेश करण्यात आले आहे.
याशिवाय, कारच्या इंटीरियरमध्येही सुधारणा करण्यात आली आहे, यामध्ये अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम, सुधारित डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ॲम्बिएंट लाइटिंग आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
कस्टमर च्या सेफ्टीच्या दृष्टीने या एस यू व्ही मध्ये 6 एअरबॅग्स, 40 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स आणि हिल होल्ड असिस्ट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
नवीन तायगुण 1.0 लिटर 8 स्पीड गियरबॉक्स आणि 1.5 लिटर 7 स्पीड डिएसजी गियरबॉक्स पेट्रोल इंजिन व नवीन 9 आकर्षक कलर्स मध्ये उपलब्ध आहेत.
नवीन तायगुण च्या टेस्ट ड्राइव्ह व बुकिंग साठी फोक्सवॅगन कोल्हापूर, सांगली, सातारा शोरूम ला भेट दयावी असे आवाहन युनिक ऑटोमोबाईल्स चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राहुल चोरडिया यांनी केले आहे.




