Spread the news

इंडिया-थायलंड ग्लोबल व्हिजन कॉन्क्लेव्ह संपन्न

­

 

कोल्हापूर, ता. 21 (प्रतिनिधी): येथील ग्लोबल व्हिजन ट्रेड ऑर्गनायझेशन मार्फत थायलंड येथे पहिली ‘इंडिया-थायलंड ग्लोबल व्हिजन कॉन्क्लेव्ह २०२६’ पार पडली.

  •  

याची माहिती देताना जागतिक दृष्टी व्यापार संघटनेचे अध्यक्ष डॉ. अक्षय शिंदे म्हणाले

सीमेपलीकडे व्यापार विस्तार करण्यास थायलंडसह इतर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी कोल्हापूरच्या एमआयडीसी क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात स्वारस्य दर्शवल्याचे व यासाठी परदेशी कंपन्यांशी सहाय्य करण्यास इच्छुक कंपन्यांशी परिषदेत प्राथमिक करार झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच भारत-आसियान-आफ्रिका विकास कॉरिडॉरमध्ये उद्योग भागीदारी घडवून आणण्यासाठी ही परीषद महत्वाची असल्याचेही सांगितले. यावेळी आशिया व अन्य खंडांतील उद्योजक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर, विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थितीत ही परिषद पार पडल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय व्यापार, उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांचा गौरव करण्यात आला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!