केडीसीसी बँकेची ग्रीन ऊर्जा निर्मितीत गरुड भरारी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

Spread the news

केडीसीसी बँकेची ग्रीन ऊर्जा निर्मितीत गरुड भरारी

­

 

बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

  •  

बँकेने उभारलेल्या १२० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

कोल्हापूर, दि. २७:
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वतःचा ग्रीन ऊर्जा प्रकल्प उभारून सौर ऊर्जा निर्मितीत गरुड भरारी घेतली आहे, असे गौरवोद्गार बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. या प्रकल्पामुळे बँकेची वार्षिक सरासरी ३० लाखाहून अधिक विजबिल खर्चात बचत होणार आहे, असेही ते म्हणाले.

केडीसीसी बँकेने ग्रीन ऊर्जा मोहिमेअंतर्गत उभारलेल्या १२० किलोमीटर क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष व माजी आमदार राजूबाबा आवळे, संचालक मंडळाच्या उपस्थितीत झाले.

भाषणात बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, केडीसीसी बँकेत दररोज साधारणता ५०० ते ६०० युनिट्स म्हणजेच दरमहा साधारणतः १४ ते १५ हजार युनिट्स विजवापर व्हायचा. त्यामुळे प्रतिमहिना सरासरी साडेचार लाख रुपये वीज बिल येत होते. त्यावर उपाय म्हणून ग्रीन ऊर्जा मोहिमेअंतर्गत बँकेने १२० किलोवॅट क्षमतेचा हा सौरऊर्जा प्रकल्प उभारला. या प्रकल्पामधून दररोज साधारणता साडेपाचशे ते सहाशे युनिट्स वीज निर्माण होणार आहे. म्हणजेच दरमहा साधारण १७ ते १८ हजार युनिट्स विजनिर्मिती होणार आहे. महावितरणच्या दिवसा सोलर वीज वापराच्या नवीन टी.ओ.डी. धोरणानुसार प्रतिमहिना विजबिल खर्चात सव्वा दोन ते अडीच लाख रुपयांची बचत होणार आहे. यामुळे वार्षिक रू. ३० लाखांची बचत होणार आहे.

चौकट…..
अडीच- तीन वर्षात गुंतवणूक वसूल…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रीन ऊर्जा मोहिमेअंतर्गत केडीसीसी बँकेने उभारलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पाची किंमत रू. ६२ लाख आहे. येत्या अडीच ते तीन वर्षातच बँकेने गुंतवणूक केलेल्या खर्चाची ही सर्व रक्कम वसूल होणार असून पुढील १५ ते २० वर्षे बँकेला शून्य विज बिल येईल. यामुळे बँकेला एकूण साडेचार ते पाच कोटी रुपयांची विजबिल खर्चात बचत होईल.

यावेळी श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते हा प्रकल्प उभारणाऱ्या कोल्हापुरातील देसाई टेक्नो सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी संचालकांचा व प्रकल्प सल्लागार शिवाजी विद्यापीठाचे विद्युत उप अभियंता अमित कांबळे यांचा सत्कार झाला.

यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैया माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, विजयसिंह माने, राजेश पाटील, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे व गजानन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. तसेच बँकेचे सर्व विभागांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
……..

कोल्हापूर- केडीसीसी बँकेने ग्रीन ऊर्जा मोहिमेअंतर्गत मला उभारलेल्या १२० किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व संचालकांच्या हस्ते झाले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!