दीपकभाई केदार, उत्कर्ष शिंदे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार जाहीर
26 जून रोजी सहाव्या नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये कोल्हापुरात वितरण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मानवतावादी विचारांची जोपासना, सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा या वर्षीचा मानवतावादी सांस्कृतिक चळवळचा प्रतिष्ठेचा “राजर्षी शाहू जीवन गौरव’ पुरस्कार ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आणि सुप्रसिद्ध गायक व अभिनेते उत्कर्ष शिंदे यांना जाहीर झाला असून शुक्रवार, दि. 26 जून 2026 रोजी सकाळी 11.30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि निर्मिती विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमदादा कांबळे, डॉ. कपिल राजहंस, भरत रसाळे, मदन पवार, अनिल म्हमाने, डॉ. वसंत भागवत, डॉ. शोभा चाळके, विश्वास तरटे तसेच अॅड. करुणा विमल उपस्थित राहणार आहे.
यावेळी निर्मिती फिल्म क्लब व बालसाहित्य कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचेही आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभरातून बळीराजा, अनिष्ट, फड, चटका, द अनडाइंग स्पिरिट ऑफ डॉक्टर्स, निसर्ग, मायमाती, काही क्षण, वक्त, श्याम विरुद्ध श्याम, सांजवात, सजा चौरंगा, कोकणातील निसर्ग आणि शेतकरी, गजरा, आर्टिस्ट शंकर सोनावणे डॉक्युमेंटरी, स्क्रोल, नापास, अभी ना जाओ छोडकर, छबू,नटराजा, मधली सुट्टी, संघर्षा, फॅक्टरी, वणवा, अम्मा-द बिगीनिंग, बळीवंश, मित्र धन या एकूण 27 नामांकन शॉर्ट फिल्मच्या टीम सहभागी होणार आहेत.
बालकांमधील सृजनशीलता, कल्पकता आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी बद्दल आदित्य म्हमाने, प्रहर्ष मुळे, दुर्वा राजहंस, शिवाय शितोळे, अमिरत्न मिणचेकर, दिक्षा तरटे, समरजीत जितकर, भूमी पासवान, अधिराज अथने, स्वराली इंगळे यांना ‘लोकराजा राष्ट्रीय बाल सन्मान पुरस्कार’ देऊन तर डॉ. सविता व्हटकर, शंकर पुजारी, किशोर थोरात, पुरुषोत्तम पवार, डॉ. रिझवान खान, जी. एल. तिरपुडे, प्रा. सारिका उजगरे, विनायक शिंदे, प्रज्ञा काटे, अरुण भोसले, प्रा. राजेंद्र कोरे, दिनकरराव लांडगे, हर्षल सोनवणे, डॉ. झुंजार माने, सरिता सासणे, विजय नायकुडे, गोरखनाथ चिखलकर यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर, सहनिमंत्रक गंगाधर म्हमाने, अश्वजित तरटे, अभिजीत मासुर्लीकर, अर्हंत मिणचेकर, शिवतेज राजहंस, अन्वय म्हमाने यांनी केले आहे.
सर्व चित्रपटप्रेमी, कलाकार, साहित्यिक आणि नागरिकांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे.





