ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर (TAAK)
सहावी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
कोल्हापूरच्या पर्यटन व्यवसायिकांची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार 15 जुलै रोजी गगनबावड्यातील उर्मिला ग्रीन काऊंटी या ठिकाणी संपन्न झाली.यावेळी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेची सुरुवात कार्यक्रम स्थळी चाफ्याचे झाड लावून करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत संचालक श्री सतीश दळवी यांनी केले. पर्यटन व्यवसाय वाढीसाठी संघटनेने आयोजित केलेल्या वर्षभरातील विविध उपक्रमांची माहिती उपाध्यक्ष श्री रवी पोतदार यांनी दिली.
2025-26 च्या वार्षिक ताळेबंदाची विस्तृत माहिती खजिनदार संजीव संजय गांधी यांनी दिली व त्या वर्षातला जमा खर्च सर्व सदस्यांनी हात उंचावून मान्य केला. व पुढील वर्षीचा 26-27 च्या अंदाजे खर्चा ला मान्यता देण्यात आली.
येणाऱ्या काळामध्ये सदस्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी विविध उपक्रम हाती घेणे येणाऱ्या काळाची गरज आहे आणि त्यासाठी योजनाबद्ध उपक्रमांची आखणीची माहिती संचालक श्री अमित चौकले यांनी दिली . संघटना बांधणी मधील महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या TAAK कनेक्ट या उपक्रमाची रूप रेखा संचालक श्री कृष्णराव माळी यांनी मांडली.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्री बळीराम वराडे यांनी संघटनेच्या वाटचालीतील विविध टप्पे, तसेच व्यावसाय वृद्धीसाठी या ए आय च्या जमान्यात व स्पर्धेच्या युगात आपला व्यवसाय कसा करायचा याबद्दल आपले विचार अधोरेखित केले अधोरेखित केले.
उर्मिला ग्रीन काउंटी ने सभा आयोजन पुरस्कृत केल्या बद्दल त्यांचे आभार मानले. TAAK संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन संस्थेचे सभासद श्री फडणीस, उर्मिलाचे संचालक श्री रवी केसरकर व संस्थेचे अध्यक्ष बळीराम वराडे यांच्या हस्ते करण्यात आले
जास्तीत जास्त लोकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी असं आव्हान करण्यात आलं
कोल्हापूरच्या नामांकित पंचगंगा सहकारी बँकेने पर्यटन व्यवसायासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध सुविधा आणि कर्ज योजनांची माहिती यावेळी दिली. रिसॉर्ट चे संचालक रविकिरण केसरकर यांनी त्यांचे नाविन्य आणि गगनबावडा पर्यटनासाठी चे विविध उपक्रम सादर केले.
कार्यक्रमाच्या सांगतेला सर्व सदस्यांना शिव महोत्सव चाफा रोप देऊन संचालक श्री राजू रायकर यांनी आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन सहसचिव इमरान मुल्ला यांनी केले .
सर्वसाधारण सभेची सांगता झाल्यावर उर्मिला काउंटिंग मध्ये मुक्काम करून सदस्यांचा स्नेह मेळावा साजरा करण्यात आला.




