Spread the news

*गोकुळच्या अवसयनातील दूध संस्थांच्या निकालासाठी* *गडहिंग्लजकरांचा एल्गार*
*श्री.सतीश पाटील  यांच्या* *नेतृत्वाखाली उग्र मोर्चा; वेळेत* *निकाल न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा*
गडहिंग्लज | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या अवसयनातून वगळण्यात आलेल्या दूध संस्थांचा निकाल तात्काळ जाहीर करावा व पात्र संस्थांना मतदानाचा अधिकार द्यावा, या मागणीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्था *प्रतिनिधींनी सन्मानीय श्री. सतीश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली जोरदार एल्गार* *पुकारत उग्र मोर्चा काढला* . यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत “न्याय द्या, अन्यथा संघर्ष अटळ!” असा इशारा देण्यात आला.
गडहिंग्लज तालुक्यातील अनेक दूध संस्थांची सुनावणी होऊन एक महिना उलटून गेला, मात्र सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर कार्यालयाकडून अद्याप अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी, दूध उत्पादक आणि छोट्या गावांतील दूध संस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला खडसावत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सुनावणी झाली, कागदपत्रे पूर्ण झाली, तरी निकाल रखडवण्यामागे नेमके कारण काय? पात्र की अपात्र याचा निर्णय तातडीने घ्या. अन्यथा शेतकरी, दूध उत्पादक आणि संस्था प्रतिनिधींना सोबत घेऊन आणखी उग्र आंदोलन छेडण्यात येईल.”
गोकुळच्या लोकशाही प्रक्रियेत ग्रामीण भागातील दूध संस्थांना डावलण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. विशेषतः डोंगराळ व ग्रामीण भागातील छोट्या दूध संस्था प्रतिकूल परिस्थितीतही नियमित दूध संकलन करून शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मजबूत ठेवत आहेत. उन्हाळ्यात चाऱ्याचा तुटवडा, आर्थिक अडचणी आणि भौगोलिक अडथळे असतानाही या संस्था दूध पुरवठा अखंड ठेवतात. अशा कष्टकरी संस्थांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
*मा.श्री. सतीश पाटील साहेब* यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये
*मा. श्री. प्रकाश पताडे साहेब (चेअरमन – गोडसाखर,* *गडहिंग्लज), मा. श्री. अरुण गवळी साहेब (संचालक – गोडसाखर,* *गडहिंग्लज), श्री. राकेश पाटील, श्री. हसन शेख, श्री.* *मलगोंडा पाटील (संचालक – तालुका शेतकरी संघ), श्री. बसगोंडा पाटील (निलजी), श्री. संग्राम* *पाटील, श्री. सुनील शिंदे, श्री. अमर पाटील, श्री. क्रांती मगदूम, श्री. विनायक पाटील, श्री.* *शगुंशी (नुल), श्री. भीमराव राजाराम, श्री. प्रकाश* *पाटील तसेच तालुक्यातील विविध दूध संस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.*
“शेतकऱ्यांच्या घामाचा आणि कष्टाचा आदर करा; दूध संस्थांना न्याय द्या, अन्यथा रस्त्यावरचा लढा अधिक तीव्र होईल,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
*या समयी मा. कृष्णात ठाकरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कोल्हापूर यांनी लवकरात लवकर सुनावणी घेऊन पात्र संस्थाना मतदानाचा अधिकार देण्यात येईल असे वचन देण्यात आले* .

­

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!