महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष डॉ.राहुल नार्वेकर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि शाल-श्रीफळ देऊन अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूरच्या महापौर सौ.रूपाराणी निकम उपस्थित होत्या.
यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार राजेश क्षीरसागर आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सोबत ऐतिहासिक व साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी जनसुराज्य युवाशक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम, उपमहापौर अक्षय जरग, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते



