शाहूंचा सामाजिक सलोखा जपण्याचा निर्धार
राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे अभिवादन
राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक सलोख्याची वीन
घट्ट जपण्याचा निर्धार शाहू महाराजांच्या १०४ व्या स्मृती दिनी त्यांच्या समाधीस्थळी शाहू प्रेमींनी व्यक्त केला.
कोल्हापूरातील विविध समाज व संस्था संलग्नित राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीने जेष्ठ मार्गदर्शक दिलीप पवार यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राजर्षी शाहूंची प्रतिमा आयुक्त डॉ राजेंद्र भारुड, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजू लाटकर सह अन्य नगरसेवक यांना देवून स्वागत केले.यावेळीशाहू सलोखा महेश मछले आनंद म्हाळूंगकर,कादर मलबारी, डी जी भास्कर, विजय पाटील महेश जाधव,डॉ विद्या साळोखे,शैलजा भोसले, दिलीप सावंत,राजेश वरक डी ए. पाटील जयेश आओसवाल अनिल गिरी संपत चव्हाण पाटील संजय कांबळे,बाळासो भोसले विजय शिंदे,दिलीप मोरे सह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते




