जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त यशस्वी प्रशिक्षणार्थी, उद्योजकांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Spread the news

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त यशस्वी प्रशिक्षणार्थी, उद्योजकांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

­

 

कोल्हापूर, दि. २४ जुलै २०२६ :
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला “यशस्वी प्रशिक्षणार्थी, उद्योजकांचा सन्मान व प्रमाणपत्र वितरण सोहळा” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

  •  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. अरुंधती महाडिक, अध्यक्षा, भागीरथी महिला संस्था, कोल्हापूर या उपस्थित होत्या.

कार्यक्रमास श्री. सुधाकर भदरगे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, श्री. सारंग कापूरकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सौ. सुषमा पाटील, भागीरथी सदस्य तसेच सौ. शीतल तिरुके, भागीरथी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व, युवकांसाठी उपलब्ध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, तसेच उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांनी आत्मनिर्भर बनून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर विविध प्रशिक्षणांमधून रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थी व उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून कौशल्य प्रशिक्षणामुळे आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती उपस्थितांसमोर मांडली.

कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पालक, प्रशिक्षणार्थी, माजी विद्यार्थी तसेच नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. सीमा स्वामी व सौ. नीता आवळे यांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूरच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

शेवटी सौ. आसमा पठाण, विभाग प्रमुख, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, कोल्हापूर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पाहुणे, उद्योग प्रतिनिधी, पालक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.

“कौशल्यातून स्वावलंबन… स्वावलंबनातून समृद्धी!” या संदेशाला साजेसा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!